कोरोना मृत्यूनंतरही पाठ सोडेना, अंत्यविधीच्या खर्चात 5 हजारांची वाढ?

साम टीव्ही
शनिवार, 18 जुलै 2020
  • कोरोना मृत्यूनंतरही पाठ सोडेना
  • कोरोना काळात अंत्यविधी महागला
  • अंत्यविधीच्या खर्चात 5 हजारांची वाढ ?

कोरोना संकटामुळे महागाईत भर पडलीय. कोरोनामुळे रोजच्या जगण्यातील वस्तू, सेवा महाग झाल्या आहेतच पण मृत्यूनंतरही कोरोना सामान्यांनची पाठ सोडत नाहीये. कारण अंत्यविधीचा खर्चही वाढत चाललाय.

गेल्या 5 महिन्यांपासून तुम्ही आम्ही कोरोनाशी झुंजतोय. आपल्यातील अशी अनेक कुटुंब आहेत ज्यांना दररोज दोन वेळचं जेवणही मिळेल की नाही याची भ्रांत आहे. कोरोनामुळे भाज्या महागल्या, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले. त्यातूनही कसाबसा तग धरला तर लुटारू हॉस्पिटल्सची संख्याही कमी नाही. एकीकडे जगण्याचा संघर्ष सुरूंय तर दुसरीकडे मृत्यूही महागाईच्या खाईत लोटू पाहतोय. मृत्युनंतर अंत्यविधीचा खर्च थोडा थोडका नव्हे तर तब्बल 5000 रूपयांनी वाढलाय. वाहतुकीच्या मर्यादित सुविधा, इतर निर्बंध आणि करोना संसर्गाचा धोका यामुळे मुंबई तसेच मोठ्रया शहरांमधे भटजी मिळणं कठीण झालंय. त्याचबरोबर दशक्रिया विधीच्या खर्चातही काही भटजींनी पाच हजार रुपयांची वाढ केल्याचं सूत्रांनी सांगितल. त्यामुळे 15 हजारांत होणारा विधी आता 20 हजारांवर जाऊन पोहचलाय. 

एका माहितीनुसार...

  • अंत्यविधीसाठी लागणारा लाकडाचा खर्च 
  • 2 ते 3 हजार इतका येतो मात्र लोक लॉकडाऊनमुळे काळ्याबाजारत हीच लाकडं 4 ते 5 हजारांना विकली जातात.
  • चंदनाचं लाकूड - 5 ते 10 हजार रुपयांमध्ये मिळत होतं. मात्र काळ्या बाजारात तेही 10 ते 12 हजारांत मिळतंय.
  • आधी शववाहिनीसाठी 2500 घेतले जायचे मात्र आता 10 ते 15 हजार रूपये घेतले जातायेत. 
  • इतकच काय तर शवविच्छेदन झाल्यानंतर लागणारं सफेद कापड शासनाकडून मोफत असतं मात्र आता कर्मचारी तिथंही एक ते दीड हजारांची मागणी करू लागले आहेत. 
  • करोनाबाधिताच्या मृतदेहाला मंत्राग्नी देणं शक्य नसल्यानं धर्मशास्त्रातील फारशा न वापरला जाणाऱ्या पालाश विधीचा वापर गेल्या महिन्याभरात वाढलाय. या विधीकरिता बऱ्यापैकी दक्षिणा मिळत असल्यानं अन्य धार्मिक कार्ये करणारे भटजीही आता या विधीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे तिथेही खर्च वाढलाय. कोरोना मृत्यूनंतरही पाठ सोडत नाही हेच खरंय..


संबंधित बातम्या

Saam TV Live