ही कोणती पद्धत गणपतीच्या स्वागताची; अतिउत्साही भक्तांचा उच्छाद; बसच्या टपावर बिभत्स डान्स

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 सप्टेंबर 2018

बाप्पा विराजमान होण्यासाठी अवघे 4 दिवस बाकी असताना, सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये बाप्पाला घरी नेण्यास लगबग पाहायला मिळतेय...अनेक ठिकाणी मोठ्या गणेश मूर्तींचं वाजत गाजत आगमनही झालं. मात्र, या गणेश आगमन सोहळ्याला अतिउत्साही भक्तांच्या उच्छादामुळे गालबोट लागलं आहे. 

लालबाग फ्लायओव्हर खालील डिव्हायडरवरील मधल्या जागेत करण्यात आलेल्या सुंदर कलाकृतींचं या भक्तांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर महाराष्ट्र पोलिसांना मानवंदना करणारा पोलिस गणवेशातील पुतळाही काही तरुणांनी तोडला. एवढ्यावरच हा उच्छाद थांबला नाही तर या बेधुंद तरुणाईने चक्क बसच्या टपावर चढून डान्स करत, मोठ्या प्रमाणात नुकसानदेखील केलं.

दरम्यान यावेळी वाहतूक नियंत्रणात आणताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा यावेळी अनेकांना सामना करावा लागला. दरम्यान आगमन सोहळ्यात भान ठेवून, कोणालाही त्रास होणार नाही, सार्वजनिक बाबींना कोणताही धक्का पोहोचणार नाही, याची काळजी गणेशभक्तांनी घेण्याची गरज असल्याचं अधोरेखित झालंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live