Loksabha 2019 : गांधीनगरमध्ये अमित शहांच्या शक्तिप्रदर्शनात उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 मार्च 2019

गांधीनगर : सत्तेत सहभागी असूनही पाच वर्षे सातत्याने भाजपवर जोरदार टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपशी पुन्हा युती झाल्यानंतर आज (शनिवार) भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित होते. 

गांधीनगर : सत्तेत सहभागी असूनही पाच वर्षे सातत्याने भाजपवर जोरदार टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपशी पुन्हा युती झाल्यानंतर आज (शनिवार) भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित होते. 

शिवसेना सध्या 'झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे' या भूमिकेत आहे. अमित शहा शनिवारी गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरत आहेत या कार्यक्रमाल एनडीएतील घटक पक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी ठाकरे उपस्थित राहिले आहेत. याबरोबरच रामविलास पासवान, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रकाशसिंह बादल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही उपस्थित आहेत. अमित शहा यांचा 4 किमीचा भव्य रोड शो होणार असून, जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. 

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान युती न झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांनी एकमेकांवर टीका केली होती. त्यावेळी उद्धव यांनी शाह यांची तुलना अफजल खानशी तुलना होती. त्यानंतरही वेळोवेळी त्यांनी जाहीर भाषणांतून शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीकेचे आसूड ओढले; मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत दोन्ही पक्षांची पुन्हा युती झाली आहे. त्यामुळे ठाकरे गांधीनगरला जाणार असल्याने उद्धव ठाकरे अफजल खानाच्या फौजेत सहभागी झाल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: BJP chief Amit Shah file his nomination from Gandhinagar Uddhav Thackeray present


संबंधित बातम्या

Saam TV Live