प्रसादादरम्यान विषबाधा टाळण्यासाठी गणेशमंडळांसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक; नोंदणी न केल्यास कारवाई होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

गणेशोत्सव अगदी तोंडावर आलाय, त्यामुळं गणेशमंडळांची लगबग सुरुय. पण आता गणेशमंडळांच्या तयारीत आता आणखी एका गोष्टीची भर पडणाराय. कारण आता सरसकट प्रसाद किंवा महाप्रसादाचं वितरण करता येणार नाहीय.

आता प्रसादाचं वाटप करायचं असेल तर एफडीएची परवानगी घ्यावी लागणाराय. आणि ही नोंदणी ऑनलाईन असण्यासोबतच बंधनकारक आहे. त्यामुळं आतां मंडपासह इतर परवानगी घेण्यासाठीही धावपळ सुरू असताना महाप्रसादासाठीही परवानगी बंधनकारक आहे.

महाप्रसादादरम्यान होणारी विषबाधा टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय.
नोंदणी न करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाणाराय. त्यासाठी सहा महिन्यांची शिक्षा किंवा पाच लाख रूपये दंड अशी तरतुद आहे. 

गणेश मंडळांनी नोंदणी करूनच भक्‍तांना प्रसाद वितरित करावा असं आवाहन करण्यात येतंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live