गणेशोत्सवासाठी २९ ऑगस्ट २०१९ ला कोकणात जाणारी कोकणकन्या एक्‍स्प्रेस हाऊसफुल!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मे 2019

मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मेल-एक्‍स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग आत्तापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईतून २९ ऑगस्ट २०१९ ला कोकणात जाणारी कोकणकन्या एक्‍स्प्रेसच्या आगाऊ आरक्षणा ची प्रतीक्षा यादी ५२० वर गेल्याने कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांना अन्य पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.

२ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण चार महिनेअगोदरपासून सुरू झाले आहे. आगाऊ तिकिटांसाठी आरक्षणाचा बुधवारी (ता. १) पहिला दिवस होता. या वेळी पहिल्याच दिवशी म्हणजे २९ ऑगस्ट २०१९ ला मुंबईतून जाणारी कोकणकन्या हाऊसफुल झाली असून, प्रतीक्षा यादी ५२० च्या घरात जाऊन पोहचली आहे. दादर, वसई, ठाणे आणि पनवेल आदी स्थानकातून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या गाड्या प्रत्येक वर्षी भरभरून जातात. तसेच, खासगी वाहने, एसटी, खासगी बसप्रमाणेच मेल एक्‍स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची प्रचंड मागणी असते. पण, प्रवासी रेल्वेला अधिक पसंती देत असल्याने तिकीट खिडक्‍यांप्रमाणेच ऑनलाईन तिकीट आरक्षणदेखील दोन ते तीन तासांत फुल्ल झाल्याचे डोंबिवलीतील सदस्य बळीराम राणे यांनी सांगितले.

Web Title: marathi news ganeshotsav booking of konkan kanya express train tickets

संबंधित बातम्या

Saam TV Live