लग्नसराई ठरला दुष्काळात आधार; गंगापूरमध्ये सर्व मंगल कार्यालयांची पुढील तीन महिन्यांची शंभर टक्के बुकिंग

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 जानेवारी 2019

गंगापूर - लग्नसराई दुष्काळात आधार ठरत असून, बेरोजगार मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. अत्यल्प पावसामुळे तालुका दुष्काळग्रस्त असला तरीही लग्नसराईचा सुकाळ दिसून येत आहे. शहरातील सर्व मंगल कार्यालयांची पुढील तीन महिन्यांची शंभर टक्के बुकिंग अगोदरच झाली आहे. 

गंगापूर - लग्नसराई दुष्काळात आधार ठरत असून, बेरोजगार मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. अत्यल्प पावसामुळे तालुका दुष्काळग्रस्त असला तरीही लग्नसराईचा सुकाळ दिसून येत आहे. शहरातील सर्व मंगल कार्यालयांची पुढील तीन महिन्यांची शंभर टक्के बुकिंग अगोदरच झाली आहे. 

लग्नसमारंभात पूर्वी घरीच स्वयंपाक केला जायचा. आता स्वयंपाक करण्यापासून ते वाढप्यापर्यंतची सर्वच कामे रेडिमेड  दिली जातात. आचारी, केटरर्स मिळून तीस ते पस्तीस जणांचा समूह गटाने काम करीत असतो. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. या कामासाठी लागणारे मनुष्यबळही मोठे असल्याने तालुक्‍यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा लग्नकार्य पुढे ढकलले जाईल किंवा थोडक्‍यात विवाह करतील अशी अपेक्षा असताना वधू पित्याने दुष्काळातही भविष्याची चिंता न करता धूमधडाक्‍यात लग्न करण्यास सुरवात केली आहे.

दुष्काळात लग्नसराई मोठा अधार देत असून, बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. नागरिकांनी दोन महिने आधीच मंगल कार्यालये बुक केली आहेत. 
- अरुण साद्धे, मालक, मंगल कार्यालय

सिझनेबल व्यवसायात तरुणाची उडी 
पत्रिका व्यवसायातून तरुणाईला नवा रोजगार मिळाला आहे. पत्रिका बनविणे, छपाई करणे आदी सिझनेबल व्यवसायाकडे तरुण वळत आहे. सीझन साधण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र आहे. तसेच त्याला नव्या कल्पनांची जोड मिळत असल्याने नवनव्या प्रकारच्या पत्रिका बाजारात उपलब्ध आहेत.

Web Title: marathi news gangapur wedding season becoming saviour in nasty droughts


संबंधित बातम्या

Saam TV Live