(VIDEO) आॅनलाईन अर्जाचे विघ्न तीन दिवसांत हटणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

येत्या रविवारी सुट्टीच्या दिवशी बहुतांशी गणेश मंडळे गणेशमूर्ती आणणार आहेत. मात्र मंडपाची परवानगी अद्यापही मिळालेली नाही. ऑनलाइन अर्जाचे हे विघ्न दूर करून येत्या तीन दिवसांत या प्रक्रियेला वेग देण्याची हमी पालिका प्रशासनाने दिली आहे. यासाठी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेने या वर्षीपासून ऑनलाइन पद्धत सुरू केली. मात्र तांत्रिक अडचण आणि पालिकेच्या संथ कारभारामुळे आतापर्यंत 1 हजार 463 पैकी केवळ 427 मंडळांना मंडपासाठी परवानगी मिळाली आहे.

यामुळे हवालदिल झालेल्या गणेशोत्सव मंडळांनी अर्जाची मुदत वाढवून मिळण्याची मागणी केली होती. गणेशोत्सवासाठी अवघे दोन आठवडे उरले आहेत. मात्र अद्याप मंडपाची परवानगी नसल्याने गणेशमूर्ती ठेवायची कुठे व सजावट, देखावे उभारायचे कधी, असा पेच मंडळांसमोर आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. बुजवलेले खड्डेही पुन्हा उखडले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी खड्डे बुजवले जातील, अशी ग्वाही प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना दिली आहे. 

WebTitle : marathi news ganpati pandal permissions in mumbai pending 

संबंधित बातम्या

Saam TV Live