अबब!  गायीच्या पोटातून निघाला 50 किलो कचरा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

नागरी वस्तीत अस्ताव्यस्त पडलेला कचरा जनावरांच्या जिवावर उठलाय. परभणी शहरातील राधाजी वाघमारे यांच्या गाईच्या पोटात तब्बल 50 किलो कचरा सापडलाय. वाघामारे यांची गाय गेल्या काही दिवसांपासून काहीच खात नव्हती. त्यामुळे त्यांनी कृषी विद्यापीठातल्या पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये  गायीची तपासणी केली.

तिथल्या डॉक्टरांनी गायीच्या पोटावर शस्त्रक्रिया केली तेव्हा त्यांना गायीच्या पोटात 50 किलो कचरा आढळून आला. आता या गायीची प्रकृती सुधारतीये. दुसरीकडे साताऱ्यात एका म्हशीनं चक्क मंगळसूत्र गिळल्याची घटना घडलीय. खटाव येथील सुनील खाडे यांची मुलगी रक्षाबंधनासाठी माहेरी आली होती.

गावात चोऱ्यांचं प्रमाण जास्त असल्यानं तिनं आपले दागिने जनावरांच्या पेंढ्यात ठेवले होते. सकाळी गोठ्यातल्या एका म्हशीनं चारा खाताना तिचं ५ तोळ्यांचं मंगळसूत्र गिळलं. ही बाब लक्षात येताच वडूज येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहाय्यक उपायुक्त डॉ.नितीन खाडे आणि त्यांच्या टीमनं म्हशीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून हे मंगळसूत्र बाहेर काढलं. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live