पोलिस ठाण्यात गटारी साजरी करू नये; मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना सूचना

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पोलिस ठाण्यात गटारी साजरी करू नये, अशा स्पष्ट सूचना मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत... पोलिस ठाणे ही सार्वजनिक जागा असल्याने या ठिकाणी प्राण्यांची कत्तल नको, असेही बजावण्यात आले आहे... प्रत्येक पोलिस उपायुक्तांना पोलिस ठाण्यांतील गटारी सेलिब्रेशनवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

यंदा १२ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत असून शनिवारी ११ ऑगस्ट आषाढी अमावास्या आहे. या दिवशी किंवा दोन-तीन दिवस आधी वार पाहून पोलिस ठाण्यांमध्ये गटारी साजरी केली जाते. पोलिस ठाण्यांबरोबरच विशेष शाखा, पोलिसांशी संबंधित इतर कार्यालयातही कोंबडी मटणाचे जेवण केले जाते. ही प्रथा बंद करावी, अशा सूचना पोलिस दलाच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आल्या आहेत. 

पोलिस दलाची जनमानसांत वेगळी प्रतिमा आहे. कायद्याचे रक्षणकर्ते म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. प्राण्यांची पोलिस ठाण्यात कत्तल हे बेकायदेशीर कृत्य असून मुंबई महानगरपालिका कायदा १९९८, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुॲल्टी टू ॲनिमल ॲक्ट १९६०, मुंबई पोलिस कायदा १९५१ अंतर्गत गुन्हा आहे. हा गुन्हा करू नका आणि प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल करताना कुणी आढळल्यास कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live