गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर 'हे' सहा जण होते टार्गेटवर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमोल काळेच्या डायरीत काही नावं लिहून ठेवण्यात आली होती. ही नावं त्यांचं पुढील टार्गेट होती अशी शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयकडून मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, अमोल काळेच्या डायरीत एकूण सहा नावं आहेत. यामधील चार जण ठाण्यातील आहेत. एक जण उत्तर प्रदेशातील आहे तर सहावं नाव मुंबई एसपी असं लिहिण्यात आलं आहे. मुंबई एसपी हे नाव एसपी नंदकुमार नायर यांचं असण्याची शक्यता आहे. नंदकुमार नायर यांनीच नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पहिली अटक केली होती. त्यांनी विरेंद्र तावडेला अटक केल्यापासून टार्गेटवर असल्याची माहिती आहे. 

WebTitle : marathi news gauri lankesh case amol kale important info crime 

संबंधित बातम्या

Saam TV Live