संपूर्ण देशात आज घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाचा उत्साह

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

संपूर्ण देशात आज घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. नवरात्रीनिमित्त राज्यासह देशभरातील देवींची मंदिरं सजवण्यात आली आहेत. मंदिरांना आकर्षक रोषणाई करत फुलांची आरासदेखील करण्यात आलीय. राज्यातील विविध शक्तीपिठांमध्ये आदिशक्तीचा जागर केला जातोय.

साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवात मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय. आज पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी गर्दी केली. आज देवीचे रूप कोळूर मूकांबिका या स्वरूपातलं आहे. मुंबईच्या मुंबादेवी मंदिरातही भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलीय. देवी आरती आणि पूजा करण्यात आली. भाविकांनीही मनोभावे देवीचं दर्शन घेतलं. मुंबईतल्याच महालक्ष्मी मंदिरातही शानदार सजावट करण्यात आली असून पुढील नऊ दिवस सर्वच मंदिरांमध्ये भाविकांती मोठी गर्दी असणार आहे.

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून आज घटस्थापना झाली. 

WebTitle : marathi news ghatasthapana navratri 2018 starts in india 

संबंधित बातम्या

Saam TV Live