घाटकोपर विमान अपघात : कंटेनरने आणलं होतं भंगारातील विमान...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

घाटकोपर परिसरात कोसळलेले C-90 जातीचे विमान चार वर्षांपासून जुहू परिसरात केवळ उभे होते. चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारकडून विकत घेतलेले हे विमान कंटनेर वाहनातून रस्त्यावरुन मुंबईत आणले गेले. DGCA शी संबंधित एका उच्च पदस्य अधिकाऱ्याने भंगाऱाच्या किंमतीत विकत घेतलेले हे विमान 30 सेकंदाच्या वर असलेल्या विमानतळावर पोहोचू शकले नाही, यावरुन त्याची स्थिती लक्षात घ्या, असे सूत्रांनी सकाळला सांगितले.

अशोक कोठारी समुहाकडे या विमानाची मालकी आहे. निवडणुकांच्या काळात विमानांची मागणी मालते. काही उद्योग समूह नेत्यांची मर्जी मिळवण्यासाठी माफक दरात निवडणुकीच्या प्रचाराकरता विमानसेवा देतात. आगामी निवडणुका लक्षात घेत, विमानाच्या चाचणीचा निर्णय झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जातेय.

23 वर्षांची ही जुनाट तबकडी उडती करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी झाला होता. मात्र मुंबईतील बेभरवाशाच्या पावसाळ्यादरम्यान असे जुने विमान उडवण्याची परवानगी दिलीच कशी, असे अऩेक प्रश्न आता उपस्थित केले जातायेत. 

संबंधित बातम्या

Saam TV Live