भूत करतंय व्यायाम?

साम टीव्ही
शनिवार, 13 जून 2020
  • भूत करतंय व्यायाम?
  • काळोखात भूत व्यायाम करत असल्याचा दावा
  • काय आहे व्हायरल व्हिडीओमागचं सत्य?

एकीकडे कोरोनाचं संकट असतानाच दुसरीकडे 19 सेकंदाच्या एका व्हिडीओनं लोकांच्या मनात दहशत निर्माण झालीय. चक्क भूत व्यायाम करतंय असा दावा केला जातोय.

हाच आहे तो व्हिडीओ...बघा, काळोखात पार्कामधील व्यायामाचं मशिन आपोआप हालताना दिसतंय. मशिनचा आवाजही येतोय. पण, इथे कुणीही नाहीये. तरीदेखील ही मशिन कशी काय हलतेय ते लोक लांबून पाहत होते. हा प्रकार विचित्र असल्याची चर्चा सुरू होती. भूतच या मशिनवर व्यायाम करत असल्याचा दावा अनेकांनी केला. पण, जगात भूत नाही, मग मशिन आपोआप कशी काय हलतेय, याची पडताळणी आम्ही सुरू केली.

पार्कमध्ये व्यायामाचं मशिन वेगाने खाली वर जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हे भूतच असल्याचा दावा केल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमने व्हिडीओची पडताळणी सुरू केली. भूत नाही मग इथे भूत कसं काय आलं? हाच प्रश्न आम्हाला पडला. तितल्या तपास अधिकाऱ्यांकडे याबद्दल विचारलं त्यावेळी त्यांनी काय सांगितलं पाहा.

त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...
उत्तर प्रदेशच्या झासीमधला हा व्हिडीओ आहे

भूत व्यायाम करत असल्याची फक्त अफवा

व्यायाम मशिनला नुकतीच ग्रीस घातली होती

ग्रीसमुळे मशिन स्मूथ झाल्याने हालत होती 

मशिन आपोआप हालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल करून, बघा, कसं भूत व्यायाम करतंय असा दावा केला. व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाल्याने अफवांना उधाण आलं. त्यामुळं आता हा व्हिडीओ कुणी बनवला? कोरोनाच्या संकटात आता अफवा कोण पसरवतंय? याचा तपास पोलिस करतायत. आमच्या पडताळणी पार्कात भूत व्यायाम करत असल्याचा दावा असत्य ठरला. मात्र, असे व्हिडीओ व्हायरल करून लोकांची दिशाभूल करणं योग्य नव्हे.


संबंधित बातम्या

Saam TV Live