VIDEO | रात्री रस्त्यावर फिरणारं भूत गजाआड; लोकांना घाबरवणाऱ्या

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

भुताच्या गोष्टी आपण वाचल्यायत, टीव्हीवर अनेक भुताच्या मालिका पाहिल्यायत...पण, रात्री अचानक भूत समोर आलं तर काय कराल...नक्कीच भूत पाहून घाबराल...पण, भुतालाच पोलिसांनी बेड्या ठोकल्यायत...नक्की काय आहे हा प्रकार पाहुयात  या सविस्तर विश्लेषणातून...

भुताच्या गोष्टी आपण वाचल्यायत, टीव्हीवर अनेक भुताच्या मालिका पाहिल्यायत...पण, रात्री अचानक भूत समोर आलं तर काय कराल...नक्कीच भूत पाहून घाबराल...पण, भुतालाच पोलिसांनी बेड्या ठोकल्यायत...नक्की काय आहे हा प्रकार पाहुयात  या सविस्तर विश्लेषणातून...

रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत येणाऱ्या जाणाऱ्यांना हे भूत घाबरवायचं...पण, हे भूत आता पोलिसांच्या जाळ्यात अडकलंय...(प्ले व्हिज) रस्त्यावर भूत फिरतंय म्हणून लोक रात्रीचे बाहेरही पडत नव्हते...यांचा अवतार पाहून या रस्त्यावरून जायची हिंमतही कोण करत नव्हतं...कधी रस्त्यावरून चालणाऱ्या माणसासमोर अचानक उडी मारणं...गाडीवर चढून ड्रायव्हरला घाबरवणं...असे प्रकार रोजच सुरू होते...हा सगळा खेळ सुरू होता, आपल्या हौशेसाठी...भुताचा वेश धारण करून हे सगळेजण रात्री घराबाहेर पडायचे...आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना हे त्रास द्यायचे...पण, एक दिवस स्थानिकांनी यांची तक्रार पोलिसांत केली आणि मग पोलिसांनी या भुताच्या रंगेहात मुसक्या आवळल्या.

युट्यूब व्हिडीओसाठी रस्त्यावर भूत बनून हे सगळेजण प्रँक करायचे...सात विद्यार्थी लोकांना घाबरवण्यासाठी व्हिडीओ बनवायचे...रात्री बनवलेले प्रँकचे व्हिडीओ कुकी पेडीया नावाने युट्यूब चॅनेलवर अपलोड करायचे...हे विद्यार्थी भुताच्या वेशात रस्त्यावर उतरुन सगळ्यांनाच त्रास द्यायचे...लोकांनी बघून बघून घेतलं आणि यांची एक दिवस तक्रार केली...आणि यांना प्रँक व्हिडीओ बनवतानाच पोलिसांनी 2 वाजता ताब्यात घेतलं.

हे सगळेजण बंगळुरूच्या आरटी नगर परिसरात राहणारे आहेत...हौसेपोटी व्हिडीओ तयार करायचे...एक जण मृत असल्याचं नाटक करत होता, तर इतर जण त्याच्याभोवती गर्दी करत लोकांना घाबरवायचे...पण, या सगळ्यात एखाद्याचा अपघात झाला असता, किंवा काही बरं वाईट झालं असतं तर ते केवढ्यात पडलं असतं...त्यामुळं अशा प्रकारे प्रँक करणं योग्य नाही...आता पोलिस यांच्यावर कारवाई करतीलच पण, तुम्ही असे व्हिडीओ बनवत असाल तर सावध व्हा.

Web Title -  That ghost has arrested by police 


संबंधित बातम्या

Saam TV Live