लग्नात आहेर म्हणून मिळालं 5 लिटर पेट्रोल

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दररोज वाढणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडलंय. अशा परिस्थितीत तमिळनाडूमध्ये एका लग्नसोहळ्यात नवविवाहित जोडप्याला चक्क पेट्रोल गिफ्ट मिळालंय. आहेरात नवरदेवाच्या मित्रांनी नवविवाहित जोडप्याला चक्क 5 लिटर पेट्रोल दिलंय. लग्न समारंभात नवरदेवाच्या मित्रांनी पेट्रोलनं भरलेला कॅन गिफ्ट केला.

तमिळनाडूत पेट्रोलच्या दरांनी 85 चा टप्पा पार केलाय. देशातल्या अनेक शहरात पेट्रोलच्या दरांनी नव्वदी पार केलीय. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडतोय. अशात तमिळनाडूच्या या विवाहसोहळ्यात नवविवाहित जोडप्याला चक्क 5 लिटर पेट्रोलचा आहेर मिळालाय. खरंच हे जोडपं खूपच भाग्यवान म्हणावं लागेल. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live