'ती' नाराजी दूर करण्यासाठी गिरीश महाजन अहमदाबादमध्ये

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 मार्च 2020

नाशिक महापालिकेत सभापतीपदावरून नेत्यांमध्ये नाराजी नाट्य

सदस्यांशी चर्चा करण्यासाठी गिरीश महाजन अहमदाबादमध्ये दाखल

सदस्यांशी 'वन टू वन' चर्चा करणार

 

नाशिक : स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सहलीला गेलेल्या भाजपच्या नगरसेवकांमधील नाराजी लक्षात घेता माजी मंत्री गिरीश महाजन अहमदाबाद येथे दाखल झाल्याचे समजते. येथे स्थायी समिती सदस्यांशी ते "वन टू वन' चर्चा करून सभापतिपदासाठी एकमत करणार असल्याचे बोलले जात आहे.

महाजन यांचे नाशिकमधील सर्व व्यवहार पाहणारे नीलेश बोरा दोन दिवसांपासून नगरसेवकांवर वॉच ठेवून असल्याने सभापतिपदासाठी उमेदवार निश्‍चित असताना चर्चेचा फक्त फार्स राहणार असल्याची प्रतिक्रिया भाजपमधूनच दिली जात आहे. दरम्यान, स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून अहमदाबाद येथे सहलीला गेलेल्या सदस्यांमधील नाराजी उफाळून आल्याने व त्याचा नकारात्मक परिणाम संघटनेवर होऊ नये म्हणून नजरकैदेतील सदस्यांचे मंगळवारी (ता. 3) फोटोसेशन घडवून सारे काही आलबेल असल्याचा खटाटोप सोशल मीडियातून करण्यात आला; परंतु त्या फोटोत स्थायी सदस्यांची संख्या अपुरी असल्याने नाराजी स्पष्टपणे जाणवत असल्याचे भाजपमधूनच बोलले जात आहे.

Web Title Girish Mahajan In Ahmedabad


संबंधित बातम्या

Saam TV Live