गिरीष महाजन 81 डॉक्टरांच्या पथकासह केरळात दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

केरळ राज्यात पावसाचे थैमान चालू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांना मदत मिळत आहे. अनेक राज्यातून अन्न, कपडे, रोख रक्कम पुरवली जात आहे. महाराष्ट्राकडूनही मदत पुरवली जात असतानाच आज (ता. 20) जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे 81 डॉक्टरांच्या पथकासह त्रिवेंद्रमला रवाना झाले आहेत. हवाई दल व 81 डॉक्टरांच्या तुकडीसह महाराष्ट्राकडून केरळला मदत पुरवण्यात आली आहे. 

केरळमध्ये लष्कराचे बचावकार्य जोरात सुरू असून, अनेक बेघर नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच पेटीएम व अॅमेझॉनवरून वस्तू व पैशांची मदत मागण्यात आली आहे. देशभरातून, तसेच काही इतर देशातूनही केरळ पूरग्रस्तांना मदत पुरवली जात आहे. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व जे. जे. हॉस्पिटलचे डीन डॉ. तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली 81 डॉक्टरांचे पथक हे हवाई दलाच्या विमानाने केरळमधील त्रिवेंद्रमला जाण्यासाठी निघाले आहेत. कपडे व औषध सामग्रीसह हे पथक केरळात रवाना होईल. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live