गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

राजू सोनावणे, साम टीव्ही, मुंबई
शनिवार, 22 जून 2019

विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्यात शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये मुख्यमंत्री कुणाचा यावरनं छुपा कलगीतुरा रंगायला सुरुवात झालीय. राज्यात भाजपच मोठा भाऊ आहे, मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार असं विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी केलंय. महाजनांचं हे विधान म्हणजे शिवसेनेला डिवचणं असल्याचं मानलं जातंय.

दुसरीकडे भाजप खासदार रावसाहेब दानवेंनीही मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य करत शिवसेनेला टोला हाणलाय. काहीच दिवसांपूर्वीही शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी खुद्द मुख्यमंत्र्यासमोरच सारं काही समसमान म्हणत भाजपला डिवचलं होतं. 

आता एकेक करुन भाजप नेतेही मुख्यमंत्रीपदावर दावा भाजपचाच असं उघडपणे बोलू लागलेत. एकंदरीतच जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येईल तसतसं भाजप-शिवसेनेतला मुख्यमंत्रीपदावरुन रंगणारा हा थोडा मवाळ किंवा अप्रत्यक्ष कलगीतुरा रंगत जाणार हे निश्चित.

संबंधित बातम्या

Saam TV Live