गिरीश महाजनांनी खडसेंचे आरोप हसत हसत खोडून काढले...

सरकारनामा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

जळगाव : भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोप गेले दोन दिवस झाल्यानंतर हे दोनही नेते आज हास्यविनोदात बुडाले.

त्याला निमित्त होते जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी उमेदवार निवडीचे! जळगाव जिल्हा परिषदेच्या उद्या(ता.3) होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत बोलतांना महाजन म्हणाले, जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे, यापुढेही राहिल. अध्यक्ष व उपाध्यक्ष भाजपचाच होईल.

जळगाव : भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोप गेले दोन दिवस झाल्यानंतर हे दोनही नेते आज हास्यविनोदात बुडाले.

त्याला निमित्त होते जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी उमेदवार निवडीचे! जळगाव जिल्हा परिषदेच्या उद्या(ता.3) होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत बोलतांना महाजन म्हणाले, जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे, यापुढेही राहिल. अध्यक्ष व उपाध्यक्ष भाजपचाच होईल.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाजन यांनी माझे विधानसभेचे तिकिट कापले, असा आरोप खडसे यांनी काल केला होता. ही माहिती आपल्याला कोअर कमिटीच्या एका सदस्याने दिली होती, अशीही पुष्टी त्यांनी जोडली होती. त्यामुळे हे दोन्ही नेते आता एकमेकांना भिडणार, असे वातावरण तयार झाले होते. 

खडसे यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना महाजन यांनी तो फेटाळला होता. त्यांनी याबाबत एक पुरावा द्यावा,जर आमचा दोष असेल तर आम्ही पक्ष देईल शिक्षा घेण्यास तयार आहोत. परंतु कोणताही पुरावा नसतांना आरोप म्हणजे हा तर आमच्यावर अन्यायच आहे. असे मत  महाजन यांनी "सरकारनामा'शी बोलतांना व्यक्त केले.

गिरीश महाजन म्हणाले, खडसे यांना कुणीतरी चुकिची माहिती दिलेली आहे. आमच्या बैठकित त्यांच्याबाबत कोणता विषयही झालेला नाही. केंद्रीय समितीत एकूण अठरा लोक आहेत. त्यांनीच त्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यात आमचा कोणताही संबध नाही. विशेष म्हणजे खडसे यांनाच उमेदवारी नाकारली असे नव्हे तर त्यात बावनकुळे, विनोद तावडे व इतरही हे आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या घरातील कोणालाही उमेदवारी देण्यात आली नाही, खडसे यांच्या घरातील त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी तरी देण्यात आली. त्यामुळे आम्ही उमेदवारीचे तिकीट कापल्याचा त्यांनी केलेला आरोप चुकिचा आहे.

कोअर कमेटीतील सदस्यांनी आपल्याला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. असे खडसे म्हणत आहेत. त्यांनी त्याबाबत पुरावा तरी द्यावा. जर त्यांनी पुरावा दिला तर पक्ष देईल ती शिक्षा घेण्यास आपण तयार आहोत. मी याबाबत खडसे यांना भेटणार आहे. त्यांना विचारणार आहे. त्यांनी जाहिरपणे त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला तर त्यांनी माझ्या कानात गुपीतपणे नाव सांगावे.तरीही मी शिक्षा घेण्यास तयार आहे. मात्र कोणताही पुरावा नसतांना आमच्यावर खडसे यांनी आरोप करणे म्हणजे आमच्यावर तो अन्यायच आहे. त्यांच्या मुलीला पाडल्याचा त्यांचा आरोपही निराधारच आहे, त्या मतदार संघात तीन पक्ष एकत्र झाल्याने त्यांच्या मुलीचा पराभव झाला हे आपण मागेच सांगितले आहे. तरीही त्याबाबतीत आरोप होत असेल तर ते योग्य नाही.


संबंधित बातम्या

Saam TV Live