वाँटेड कोंबड्या; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी पोलिसांना दिले कोंबड्या शोधण्याचे आदेश 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 ऑगस्ट 2018

जळगाव जिल्ह्यातले पहूर पोलिस सध्या वेगळ्याच मोहिमेवर आहेत. पोलिस आठवडाभरापासून कोंबड्या शोधतायत. त्याचं झालं असं की जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचे कार्यकर्ते दत्तात्रय गुजर यांचा पोल्ट्री फार्म आहे त्यातल्या 20 कोंबड्या चोरानं चोरून नेल्या. कार्यकर्ता पोलिस ठाण्यात गेला पण त्याचं ऐकलं नाही.

गुजर यांनी ही बाब जेव्हा गिरीश महाजनांच्या कानावर घातली तेव्हा त्यांनी पोलिसांना तातडीनं कामाला लावलं.

पोलिसांना अजूनही कोंबडीचोर आणि कोंबड्या सापडलेल्या नाहीत. दरम्यानच्या काळात गटारी होऊन गेलीय. त्यामुळं कोंबड्यांचं काय झालं असेल या कल्पनेनंच पोलिसांना घाम फुटलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live