पश्चिम आईसलँडमधून हिमनदी गायब; येत्या काही वर्षात जगबुडी अटळ? 

पश्चिम आईसलँडमधून हिमनदी गायब; येत्या काही वर्षात जगबुडी अटळ? 

निसर्गाचा समतोल ढासळल्यानं पहिल्यांदाच आईसलँडमधील एक अख्खीच्या अख्खी हिमनदी गायब झालीय. हिमनदी अशी अचानक गायब झाल्यानं जगभरातल्या शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केलीय. जगासाठी हे धोक्याचे संकेत मानले जातायेत.. पश्चिम आईसलँडमधील ओक-जोकुल ही हिमनदी अचानकपणे गायब झालीय. जागतिक तापमानवाढीचा हा एक प्रतिकुल परिणाम असल्याचं सांगण्यात येतंय. अशाच पद्धतीनं हिमनद्या गायब होत राहिल्या तर भविष्यात सारी पृथ्वीच पाण्याखाली गेलेली असेल. 

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार जगभरात दरवर्षी 600 टन कार्बनडायऑक्साईडचं उत्सर्जन होतं. त्यामुळे सूर्याची उष्णता परावर्तीत होत नाही. परिणामी जगाचं तापमान वर्षाकाठी 2 डिग्री सेल्सिअसनं वाढतंय. तापमानवाढीमुळे अंटार्टिका, ग्रीन लँड, हिमालय पर्वत वेगानं वितळू लागले आहेत. तापमान वाढीचा वेग असाच कायम राहिल्यास 2020 पर्यंत जगातील 14 द्वीप पूर्णपणे पाण्याखाली गेलेले असतील. 2050 पर्यंत 2 कोटी लोक विस्थापित होतील. त्यातूनही परिस्थिती बदलली नाही तर येत्या 30 वर्षात संपूर्ण मानवजात नष्ट होतील अशीही भीती व्यक्त होतीय. 

पश्चिम आईसलँडमधील ओकजोकुल हिमनदी संपुष्टात आल्यानंतर स्थानिक लोकांनी हिमनदीवर अंत्यसंस्कार केले. आइसलँडचे पंतप्रधान कॅटरीन जकोबस्डोटिर आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी हिमनदीला श्रद्धांजलीही वाहिली. पण इथल्या लोकांच्या मनात अद्यापही शंकेची पाल चुकचुकतेय. कारण गेल्या कित्येक पिढ्यांनी जे पाहिलं नाही ते आक्रित पाहण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. हा विनाश रोखायचा असेल तर आता प्रत्येकानं या पृथ्वीसाठी काहीतरी करायला हवं.. अन्यथा जगबुडी अटळ आहे. 

WebTitle : marathi news glacier vanished from west island effect of global warming 


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com