मुंबई - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा लिलावती रुग्णालयात दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने सायंकाळी तातडीने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

मुंबई - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने सायंकाळी तातडीने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बुधवारीच पर्रीकर अमेरिकेतून गोव्यात आले होते. काल त्यांना उलटी होऊ लागल्याने मुंबईतील डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांना त्वरित मुंबईला हलवण्यात आले. 

काल सायंकाळी 4.15 च्या विमानाने मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांचा छोटा मुलगा व डॉ. कोलवाळकर मुंबईला गेले आहेत. पुढील दोन दिवस त्यांच्यावर लिलावती इस्पितळात उपचार केले जातील, अशी माहिती सूत्रांकडून समजली

Web Title: Manohar Parrikar re-admitted to a lilawati hospital


संबंधित बातम्या

Saam TV Live