...म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री गोव्याला न जाता अमेरिकेला जाणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आज गोव्यात परतणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून कळवण्यात आले होते.

मात्र, आज ते गोव्यात न परतता पुढील उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेस जाणार आहेत. आज संध्याकाळी ते अमेरिकेस रवाना होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान पंतप्रधान मोदी पर्रिकरांची मुंबईत भेट घेणार असल्याची माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यलयाने दिली आहे. मुख्यमंत्री पर्रिकर 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी अमेरिकेहून 11 दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिंग’ स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत होते.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live