गोव्यात टॅक्स फ्री दारूचा महासेल..

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019
  • गोव्यात टॅक्स फ्री दारूचा महासेल
  • पर्यटकांना नेता येणार एकापेक्षा जास्त दारूच्या बाटल्या?
  • पर्यटनवाढीसाठी गोवा सरकारची आयडियाची कल्पना

गोवा म्हणजे अनेकांच्या स्वप्नातलं पर्यटनस्थळ. इथला निळाशार समुद्रकिनारा आणि नाईट लाईफ पर्यटकांना इथं येण्यासाठी खुणावत असते. त्यातही मद्यपींसाठी गोवा म्हणजे जणू काही स्वर्गच. इथं दारूवर टॅक्स नसल्यानं मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होती. मात्र आता हीच दारू पर्यटकांना घरीही आणता येणारंय.

गेल्या काही महिन्यांमध्ये गोव्यातील पर्यटन व्यवसाय रसातळाला गेलाय. गोव्याच्या गोव्यात खाण आणि पर्यटन व्यवसाय रसातळाला गेल्यामुळे गोवा सरकारच्या महसुलात प्रचंड घट झालीय. या पर्यटन व्यवसायाला पुन्हा नवी उभारी देण्यासाठी गोव्यात येणार्‍या पर्यटकांना एकापेक्षा अधिक दारूच्या बाटल्या नेण्याची परवानगी देण्याचा गोवा सरकार विचार करतय. हा निर्णय झाला तर निश्चित गोव्यातील पर्यटनालाही चालना मिळेल आणि महसुलातही वाढ होईल असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलाय.

  • दरवर्षी गोव्यात 80 लाख पर्यटक येतात.
  • पर्यटनातून गोव्याला 500 कोटींचा महसूल मिळतो.
  • गोव्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्यानं महसूलात घट

गोव्यात येणार्‍या पर्यटकांना सध्या देशी बनावटीची विदेशी दारूची बाटली आणि स्थानिक दारूची एक बाटली अशा दोन दोनच बाटल्या सोबत घेऊन जाण्याची परवानगी आहे. मात्र अनेक पर्यटक अवैधरीत्या दारूच्या एकापेक्षा अधिक बाटल्या सोबत घेऊन जातात. त्यामुळे पर्यटकांना एकापेक्षा अधिक दारूच्या बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी देण्याचा गोवा सरकार विचार करतंय सरकारचा निर्णय झाला तर एका पर्यटकाला चारपेक्षा जास्त दारूच्या बाटल्या मिळू शकतात. यातून तस्करीला आळा बसेल आणि पर्यटनही वाढेल. अशी गाव सरकारची आयडियाची कल्पना आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live