बॉलिवू़डच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार आर.के.स्टुडिओची मालकी गोदरेज प्रॉपर्टीज कडे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 मे 2019

मुंबई : आर. के. स्टुडिओने बॉलिवूड क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून ओळख मिळविली आहे. जवळपास 70 वर्ष जुना हा स्टुडिओ बॉलिवू़डच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार राहीला आहे. या स्टुडिओची मालकी आता नव्या मालकाकडे गेली आहे.

मुंबई : आर. के. स्टुडिओने बॉलिवूड क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून ओळख मिळविली आहे. जवळपास 70 वर्ष जुना हा स्टुडिओ बॉलिवू़डच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार राहीला आहे. या स्टुडिओची मालकी आता नव्या मालकाकडे गेली आहे.

मुंबईतील चेंबूर येथे उभा असलेला आर. के. स्टुडिओची मालकी आतापर्यंत चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी कपूर कुटुंबाकडे होती. 'गोदरेज प्रॉपर्टीज'ने आर. के. स्टुडिओ विकत घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कपूर कुटुंबीय गोदरेज प्रॉपर्टीजशी चर्चा करत होते. '2.2 एकर क्षेत्रात पसरलेल्या आर. के. स्टुडिओच्या 33,000 वर्ग मीटर क्षेत्रात आधुनिक निवासी अपार्टमेंट बांधण्यात येणार आहेत,' अशी माहिती 'गोदरेज प्रॉपर्टीज' कंपनीने दिली. शुक्रवारी या कंपनीने आर. के. स्टुडिओ विकत घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. याठिकाणी आता आलिशान फ्लॅट्स बांधले जाणार आहेत.

रणधीर कपूर यांनी सु्द्धा या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'माझ्या कुटुंबासाठी चेंबूरमधील ही जागा फार महत्त्वपूर्ण आहे. या जागेवर आता नवीन बांधकाम करण्यासाठी आम्ही गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीला निवडले आहे,' असे त्यांनी सांगितले.

स्टुडिओतून मिळणारे उत्पन्न हे फारच कमी असल्यामुळे त्याच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्यामुळे कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता. दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर, मुले रणधीर, ऋषी आणि राजीव आणि मुलगी रितू नंदा आणि रिमा जैन यांनी एकमताने स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला असून स्टुडिओची विक्री झाल्यानंतर त्यातून येणारा नफा स्टुडिओशी संबंधित प्रत्येकाला देण्यात येणार आहे.

Web Title:marathi news Godrej Properties buys Mumbai's iconic RK studio


संबंधित बातम्या

Saam TV Live