VIDEO | 2020 मध्ये 45 हजारांवर पोहचणार सोन्याचे दर

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 1 जानेवारी 2020

2020 मध्ये सोन्याला असा भाव मिळणार आहे की जो ऐकून तुम्हीही अचंबित व्हाल.

2020 मध्ये सोन्याला असा भाव मिळणार आहे की जो ऐकून तुम्हीही अचंबित व्हाल.

तुम्ही सोने खरेदीदार असाल तर २०२० हे वर्ष तुम्ही कधीच विसरु शकणार नाही. कारण सोन्याचे दर १० ग्रॅममागे ४५ हजारांवर पोहचण्याची शक्यता आहे. बाजारातील सद्यस्थिती, मंदी आणि रुपयाचं अस्थिर मूल्य पाहता सोन्याचे दर १० ग्रॅममागे ४५ हजार रुपयांपर्यंत पोहचू शकतात. 
मोदी सरकारची धोरणं आणि शेअर बाजारातील तेजीमुळे २०१९ मध्ये सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत राहिले. 
२०१९ च्या सुरुवातीला सोन्याचे दर १० ग्रॅममध्ये 31,500 रुपये होती. हीच किंमत वर्षाअखेर ३९ हजारच्या पार गेली, २०१९ मध्ये सोन्याची सर्वाधिक किंमत ३९,९०० रुपये होती. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या आकडेवारीनुसार रिजर्व्ह बँकेसहित १४ केंद्रीय बँकामध्ये गहाण ठेवण्यात आलेल्या सोन्यामध्ये १ टननं वाढ झालीय.
शेअर बाजारातील तेजी, सरकारची धोरणं यांचा विचार करता २०२० वर्षात सोनं ४५ हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुम्ही सोनंप्रेमी असाल किंवा सोन्याकडे एक गुंतवणूक म्हणून पाहात असाल तर २०२० मध्ये सोनंखरेदी कराच.


संबंधित बातम्या

Saam TV Live