'गोल्ड ईटीएफ'ना 7 वर्षांनंतर सोन्याचे दिवस

'गोल्ड ईटीएफ'ना 7 वर्षांनंतर सोन्याचे दिवस

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये (ईटीएफ) 2019 मध्ये गुंतवणूकदारांची पावले वळली आहेत. सात वर्षांच्या अवधीनंतर पुन्हा एकदा गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूकीत वाढ झाली आहे. 2019 या वर्षात गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांनी 16 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जागतिक बाजारातील मंदी आणि इक्विटी आणि डेट प्रकारातील अस्थिरता याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार पुन्हा एकदा गोल्ड ईटीएफला पसंती देताना दिसत आहेत. 

याआधी मागील सहा वर्षे गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफकडे पाठ फिरवलेली दिसत होती. सध्याच्या परिस्थितीत अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे आणि जागतिक अर्थव्यवस्थेला असलेल्या धोक्यांमुळे गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूकीत आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. डिसेंबर 2019अखेर गोल्ड फंडातील गुंतवणूक 26 टक्क्यांनी वाढून 5,768 कोटी रुपयांवर पोचली आहे. डिसेंबर 2018 अखेर हीच गुंतवणूक 4,571 कोटी रुपये इतकी होती. असोसिएशन ऑफ म्यु्च्युअल फंड्स इन इंडियाने यासंदर्भातील आकडेवारीवरून ही बाब समोर येते आहे.

मागील काही वर्षात छोट्या गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफऐवजी इक्विटी प्रकारालाच प्राधान्य दिले आहे. इक्विटी प्रकारातील चांगला परतावा हे त्यामागचे एक कारण होते. 2018 मध्ये गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमधून 571 कोटी रुपये काढून घेतले होते. 2017, 2016, 2015, 2014 आणि 2013 या वर्षांमध्ये अनुक्रमे 730 कोटी रुपये, 942 कोटी रुपये, 891 कोटी रुपये, 1,651 कोटी रुपये आणि 1,815 कोटी रुपये गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमधून काढून घेतले होते. 

तर 2012 या वर्षात मात्र गोल्ड ईटीएफमध्ये 1,826 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

Web Title : Good days for Gold ETF after 7 years

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com