या नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!

साम टीव्ही
गुरुवार, 23 जुलै 2020
  • यावर्षी 9 वी, अकरावीत नापास झालेल्यांसाठी खुशखबर
  • नापास झालेल्यांची पुन्हा तोंडी परीक्षा घेतली जाणार
  • 7 ऑगस्टला प्रत्यक्ष शाळेत किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सने तोंडी परीक्षा होणार
  • जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना पुढील वर्षात प्रवेश मिळणार 
  • कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

आता नववी आणि अकरावीत नापास झालेल्यांसाठी खूशखबर आहे. नापास झालेल्यांची पुन्हा तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. 7 ऑगस्टला प्रत्यक्ष शाळेत किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सने तोंडी परीक्षा होणार आहे. जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना पुढील वर्षात प्रवेश मिळणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतलाय.

 ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नववी व अकरावी परीक्षेसंदर्भात 15 एप्रिलनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागाने जाहीर केल्याची माहिती येथील शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी दिली.

‘कोरोना’च्या उद्रेकामुळे आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच नववी व आकरावीच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, त्याची निश्चित तारीख जाहीर झाली नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. तसेच दहावीचादेखील भूगोल विषयाचा अखरेचा पेपर पुढे ढकला आहे. त्यामुळे या परीक्षा कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे. सुरवातीला या परीक्षा ता. 31  मार्चनंतर निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. परंतु, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ता. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे उर्वरीत परीक्षा आता ता. 15 एप्रिलनंतर घेण्यात येईल, असे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.

विद्यार्थी, लहान बालके पोषण आहारापासून वंचित राहात असल्याने सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने विद्यार्थ्यांचे पोषण होण्याच्या दृष्टीने पोषण आहार देणे गरजेचे असल्याचे मत मांडल्यानंतर ग्रामीण भागातील शाळा स्तरावर शालेय पोषण आहार योजनेतून पुरवठा करण्यात आलेले तांदूळ, डाळी, कडधान्याचे वितरण विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेचे मुख्याध्यापक, योजनेचे काम पाहणारे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शिल्लक साठा शाळेतील विद्यार्थ्यांना व वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप होईल याचे नियोजन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वितरण करताना जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशाचे व सुचनेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे बजावण्यात आले आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live