कोरोनापासून बरी झालेली व्यक्तीच आता इतर कोरोनाग्रस्तांना बरी करणार...

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 11 एप्रिल 2020

कोरोनाच्या संकटातही दिलासा देणारी बातमी. कोरोनाच्या आजारातून बरी झालेली व्यक्तीच आता इतर कोरोनाग्रस्तांना बरी करणारेय.

कोरोनाचा संसर्ग जगभरात ज्या वेगाने होतोय त्याच वेगाने त्याच्यावर मात करण्याचं संशोधनही होतंय. कोरोनाच्या विळख्यातून सुटण्यासाठी जगभरात अनेक उपचारपद्धतींचा अवलंब केला जातोय. त्यातच संशोधकांच्या हाती आता प्लाझ्मा थेरपी लागलीय. व्हेंटिलेटरवर असलेल्या अनेक कोरोनाग्रस्तांना प्लाझ्मा थेरपीचा चांगला फायदा झाल्याचंही समोर आलंय. त्यामुळे भारतातही कोरोनाग्रस्तांवर लवकरच प्लाझ्मा थेरपीने उपचार केले जाणारेत.

प्लाझ्मा थेरपी कसा काढणार कोरोनाचा काटा?

कोरोनातून पूर्ण बरा झालेल्या रुग्णाचं रक्त काढून कोरोनाग्रस्ताच्या शरीरात सोडलं जातं. कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाच्या रक्तात रोगप्रतिकारक अँटिबॉडीज असतात. कोरातून पूर्ण बरा झालेल्या रुग्णाच्या रक्तातील घटक कोरोनाग्रस्ताला कोरोनाशी लढण्यासाठी अत्यंत मोठी ताकद देतात. 
जगभरात कोरोनावर उपचार करण्यासाठी नव्या प्लाझ्मा थेरपीचा वापर होऊ लागलाय. भारतातही या उपचार पद्धतीचा अवलंब केला जाणारेय.
प्लाझ्मा थेरपी नेमकी कुठून आली?
जिथं कोरोनाचा जन्म झाला त्याच चीनमध्ये या थेरपीचा सर्वात आधी अवलंब केलाय केलाय. कोरोनाच्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी लागू पडत असल्याचं अमेरिकन जर्नलमध्ये म्हटलंय. भारतातही या उपचारपद्धतीचा अवलंब आता सुरू होणारेय. मात्र भारतात पहिल्या टप्प्यात फक्त गंभीर रुग्णांवरच प्लाझा थेरपीने उपचार होणारेत. मूळ कोरोनाग्रस्ताला बरं करण्यासाठी सुमारे 15 दिवस लागतात, मात्र कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्ताचा वापर करून उपचार केल्यास इतर कोरोनाग्रस्त 3 ते 7 दिवसांत बरे होत असल्याचा निष्कर्ष काढला गेलाय. 

कोरोनाशी लढणाऱ्या संशोधकांनी अनेक उपचारपद्धींचा अवलंब केलाय, त्यात आता या प्लाझ्मा थेरपीची भर पडलीय. त्यामुळे कोरोनावर उपचार शोधण्यासाठी चाचपडणाऱ्या हातांना नवा आशेचा किरण सापडलाय.

Web title - marathi news good news about corona patients


संबंधित बातम्या

Saam TV Live