सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्ता आता 9 टक्क्यांवरुन 12 %

तुषार रुपनवर, साम टीव्ही, मुंबई
मंगळवार, 9 जुलै 2019

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या हालचाली सुरु झाल्यात. राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना खुशखबर देत, महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केलीय. सरकारी कर्मचारी तसंच इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता नऊ टक्क्यांवरुन बारा टक्के झालाय. अर्थ आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिलीय.

सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 9 टक्क्यावरुन 12 टक्के करण्यात आलाय. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं खूष केलंय. हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक बोनसच म्हणावा लागेल.

WebTitle : marathi news good news for government employees DA has been increased to twelve percent

संबंधित बातम्या

Saam TV Live