लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा; राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 जुलै 2019

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरवात केली असून, गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या 5 दिवसांच्या आठवड्यांचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मंत्रालयात राजपत्रित अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. तसेच कर्मचाऱ्यांसह निवृत्तीधारकांनाही महागाई भत्त्यात वाढ देण्यात येणार आहे. तर, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबतही पुढील महिन्यात निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.  

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी होती. त्याबाबत, फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली असून 31 डिसेंबर 2019 पर्यंत याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्वाच्या विषयावर निर्णय घेण्याचे सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचे हे निर्णय भाजपाला फायदेशीर ठरू शकतात. अनुकंपा भरती, केंद्र सरकारप्रमाणे सातव्या वेतन आयोगाचे भत्ते, 5 दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 वर्षे यांसह निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भातील विषयांवर फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा केली.

WebTitle : marathi news good news for government employees soon five days a week will start 

संबंधित बातम्या

Saam TV Live