खूशखबर ! आता लष्करात काम करण्याची संधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

मुंबईकर तरुणांना लष्करी सेवेची संधी
मुंबई शहर, उपनगर व परिसरातील जिल्ह्यात राहणाऱ्या तरुणांना अनेक वर्षांनी लष्करात भरती होण्याची संधी आहे. तीन टप्प्यांत होणारी ही भरती पुढील महिन्यात मुंब्रा येथे होत आहे. मुंबईतील लष्कर भरती कार्यालयाकडून ही मोहीम राबवली जाणार आहे.

मुंबईतील लष्कर भरती कार्यालयाकडून ही मोहीम राबवली जाणार आहे.मुंबई शहर, उपनगर व परिसरातील जिल्ह्यात राहणाऱ्या तरुणांना अनेक वर्षांनी लष्करात भरती होण्याची संधी आहे. तीन टप्प्यांत होणारी ही भरती पुढील महिन्यात मुंब्रा येथे होत आहे. 

ही भरती १३ ते २३ डिसेंबर २०१९ दरम्यान मुंब्र्यातील कौसा व्हॅली येथील अब्दुल कलाम आझाद क्रीडा संकुलाच्या मैदानावर होईल.

जिल्ह्यातील युवकांना संधी

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड व नाशिक

भरतीचे निकष

पद जन्म दिनांक उंची वजन छाती (न फुगवता/फुगवून) शिक्षण

शिपाई (सामान्य) १ ऑक्टोबर १९९८ १६८ सेंमी ५० ७७/८२ किमान ४५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण.

ते प्रत्येक विषयात किमान ३३ टक्के गुण

१ एप्रिल २००२

शिपाई (तांत्रिक) १ ऑक्टोबर १९९६ १६७ सेंमी ५० ७६/८१ किमान ५० टक्क्यांसह विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण

ते प्रत्येक विषयात किमान ४० टक्के गुण

१ एप्रिल २००२

शिपाई (नर्सिंग) वरीलप्रमाणे वरीलप्रमाणे ५० वरीलप्रमाणे वरीलप्रमाणे

शिपाई (तांत्रिक लिपीक) वरीलप्रमाणे १६२ सेंमी ५० ७७/८२ ६० टक्के गुणांसह कुठल्या शाखेतील बारावी उत्तीर्ण प्रत्येक विषयात किमान ५० टक्के तसेच इंग्रजी, बूक किपिंग ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आवश्यक

शिपाई (ट्रेडमन) वरीलप्रमाणे १६८ सेंमी ४८ ७६/८१ किमान आठवी ते दहावी उत्तीर्ण

अशी असेल निवड प्रक्रिया

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांची जिल्हा किंवा तालुका स्तरावर तपासणी होईल. या तपासणीची वेळ, तारीख व ठिकाण प्रवेश पत्रावर नमूद असेल. तपासणीनंतर प्रत्यक्ष भरतीच्या दिवशी (मुंब्रा येथे) शारीरिक व वैद्यकीय तपासणी होईल. दोन्ही तपासण्या यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवाराची लेखी परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारीत घेतली जाईल. त्यानंतर प्रशिक्षणासाठी अंतिम निवड केली जाईल.

कसा कराल अर्ज 

या भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

०या संकेतस्थळावर एनसीओ किंवा ओआरद्वारे भरती या विभागात गेल्यावर राज्य, जिल्हा यानुसार भरतीसंबंधीची अधिसूचना डाऊनलोड करावी.

०त्यातील माहितीनुसार ऑनलाइन अर्ज करावा.

०अर्ज केल्यावर प्रत्यक्ष भरतीवेळी शपथपत्रदेखील असणे अत्यावश्यक, त्याशिवाय उमेदवारांना प्रवेश मिळणार नाही

०वरील संकेतस्थळावर उमेदवारांना आपली माहिती टाकून पात्रता तपासता येईल.

०२७ नोव्हेंबर २०१९ ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live