खूशखबर! कांद्याचे भाव कडाडले असले तरी एक दिलासादायक बातमी

खूशखबर! कांद्याचे भाव कडाडले असले तरी एक दिलासादायक बातमी

कांदा कापला गेला की सर्वांना रडवतो मात्र आता कांदा विकत घेतानाही आता सर्वांना रडू येतंय. कारण आताचे कांद्याचे भाव पाहता कांदा घेणं, वापरणंच लोक बंद करतील अशी चिन्हं दिसतायंत. मात्र आता कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारनं इजिप्‍तहून 6090 टन, तर तुर्कीहून हजार टन कांदा मागविलाय. हा कांदा 15 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीत देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्ध होईल, अशी माहिती देण्यात आलीय.

त्यातच सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत कांद्याला देशातील उच्चांकी दर मिळालाय. तब्बल 20 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने बाजारात कांदा खरेदी करण्यात आली. कांद्याला मिळालेला आतापर्यंतचा हा विक्रमी दर ठरलाय.  महिन्याभरापासून सोलापुरात कांद्याच्या दरात तेजी कायम आहे. आठवड्याभरापासून हा दर दहा–पंधरा हजारांच्याही वर पोहोचला. या रेकॉर्डब्रेक दरामुळे कांद्याच्या किरकोळ दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सोलापुरात कांद्याला कमाल साडे सहा हजार रुपये दर मिळाला होता. मात्र आता तेवढाच स्थिर दर मिळू लागल्याने कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर सर्वसामान्यांच्या ताटातून कांदा हळूहळू गायब होऊ लागलाय.

हे ही पाहा - https://youtu.be/oWrav_gCxGs


येत्या काही दिवसात  आणखी ४ हजार टन कांदा तुर्कीहून मागविला जाणार आहे. प्रत्येकी पाच-पाच हजार टनाचे तीन टेंडर एमएमटीसीमार्फत काढले जाणार असल्याची माहिती आहे.

Web Title - Good news! Onions will import from Egypt and Turkey

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com