केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी खुशखबर 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी खुशखबर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सात टक्के महागाई भत्ता मिळतो. आता दोन टक्क्यांच्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता नऊ टक्क्यांवर पोहोचलाय. देशभरात 48 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आहेत.

तर 61 लाखांपेक्षा जास्त पेंशनधारक आहेत.सातव्या वेतन आयोगात निश्चित केलेल्या फॉर्म्युल्यानुसार महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. याआधी मार्च महिन्यातच महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली होती. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live