गुगल सांगणार मृत्यूची तारीख

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा मरणारच.... पण तो कधी मरणार हे कुणालाच सांगता येत नाही. मेडिकल सायन्समध्ये प्रचंड प्रगती झाली पण त्यालाही मृत्यूची निश्चित वेळ सांगता येत नव्हती. पण आता तुम्हाला तुमच्या मृत्यूची वेळही माहिती पडणार आहे. गुगलनं माणसाच्या मृत्यूची वेळ सांगणारं सॉफ्टवेअर विकसीत केलंय.

मृत्यू सांगणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये माणसाची संपूर्ण माहिती भरली जाते. त्याला कोणकोणते आजार आहेत याची माहितीही भरली जाते. रूग्णाच्या वैद्यकीय चाचण्यांचा अहवालही जोडले जातात. या माहितीची गोळाबेरीज करून मृत्यूची तारीख निश्चित केली जाते.

गुगलनं एका कँन्सर पेशंट महिलेवर हा प्रयोग केला होता. तो प्रयोग शंभर टक्के यशस्वी झालाय. गुगलनं सांगितलेल्या तारखेलाच त्या महिलेचा मृत्यू झाला. मेडिकल सायन्सला जे जमलं नाही ते गुगलनं करून दाखवलंय. पण या संशोधनाचा गुगल गैरवापर करणार नाही अशी ग्वाही सुंदर पिचाई यांनी दिलीय. नेहमीच नाविन्याचा ध्यास घेतलेल्या गुगलनं मृत्यूची तारीख सांगणारं सॉफ्टवेअर तयार करून वेगळेपण सिद्ध केलंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live