भाजप महामेळाव्याच्या मुख्य मंडपातल्या पोस्टरमधून गोपीनाथ मुंडे गायब  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडी मैदानावर भाजपाचा महामेळावा सुरु होण्याआधी भाजपामधील अंतर्गत धुसफूस समोर आली. स्टेजवर मुख्य मंडपामध्ये भाजपाचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो न लावल्यामुळे मुंडे समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत. यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करुन आपली नाराजी व्यक्त केली. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नाराज कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. गोपनीथ मुंडेंवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडी मैदानावर भाजपाचा महामेळावा सुरु होण्याआधी भाजपामधील अंतर्गत धुसफूस समोर आली. स्टेजवर मुख्य मंडपामध्ये भाजपाचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो न लावल्यामुळे मुंडे समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत. यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करुन आपली नाराजी व्यक्त केली. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नाराज कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. गोपनीथ मुंडेंवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्य व्यासपीठावरही अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. इतर नेत्यांच्या छायाचित्रांना मुख्य व्यासपीठावर स्थान मिळालेले नाही. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live