'एअर इंडिया' विक्रीचा मुहूर्त ठरला !

किरण राठोड
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक ऑफर्स सुरू आहेत. विविध वस्तूंवर लक्षवेधी सूट सुरू आहे..
कपडे, रोजच्या वापरातील वस्तू आणि गॅजेट इत्यादींवर सर्वांच्याच उड्या पडतायत, तर अशा या दिवाळी बंपर 
ऑफरमध्ये मोठ्या कंपन्यांसुद्धा मागे राहिल्या नाहीत.

देशातील एकमेव सरकारी विमानसेवा एअर इंडियाच्या विक्रीचा मुहूर्त ठरलाय. नेहमीच वेगवेगळ्या 
ऑफर्सनं आपल्या प्रवाशांना आकर्षित करत, तोट्यातून बाहेर पडण्यासाठी एअर इंडियाने बरेच हातपाय मारले,
पण आर्थिक स्थिती ही जैसे थेच राहिली. किंबहुना ती आणखीन बिकट झाली. अखेरीस सरकारने डोक्यावरील वाढतं
कर्ज पाहून, अखेरीस एअर इंडिया विक्रीचा निर्णय घेतला. यासाठी केंद्र सरकार निविदा मागवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

एअर इंडियाच्या विक्रीसाठी पुढील महिन्यात ही निविदा मागविली जाऊ शकते.
एअर इंडिया कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकण्याचं सरकारनं ठरवलं आहे.
त्यामुळे एरव्ही प्रवाशांच्या स्वागतासाठी सज्ज असलेला एअर इंडियाचा 'महाराजा', 
आता खरेदीदारांचे स्वागत करताना दिसल्यास नवल वाटायला नको...

Web Title : government decided to sell Air India

संबंधित बातम्या

Saam TV Live