...यामुळे लागणार लेट मार्क?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

नाशिक : राज्य शासनाने मार्चपासून पाच दिवसांचा आठवडा केला आहे. आठवड्यातील कामकाजाच्या पाच दिवसांच्या कामाच्या वेळा मात्र वाढविल्या आहेत. नेमकी हीच बाब मनमाड ते इगतपुरी कसारापर्यंतच्या सरकारी चाकरमान्यांसाठी अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईला रोज मंत्रालयासह विविध शासकीय आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना रोजच लेट मार्क लागणार आहे. 

नाशिक-मुंबईदरम्यानच्या पंचवटीच्या वेळा साधत नसल्याने लेट मार्क 

मनमाड-पंचवटी एक्‍स्प्रेस मुंबईत सकाळी साडेदहा ते पावणे अकरापर्यंत पोचते. त्यामुळे मनमाड ते कसारापर्यंत विविध भागात राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना रोजच्या रोज पंचवटी एक्‍स्प्रेसने ये-जा करून मुंबईला सकाळी कार्यालयीन वेळेत पोचता येते. मुंबईत मुक्कामी राहण्यापेक्षा नाशिकहून अप-डाउन करून रोजच शेकडो चाकरमाने पंचवटीच्या भरवशावर मुंबईत नोकऱ्या करतात. पण आता राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केला आहे. हे करताना सरकारी कार्यालयातील कामकाजाच्या वेळा मात्र 
वाढविल्या आहेत. सकाळी अर्धा तास आणि सायंकाळी अर्धा तास असा रोजचा एक तास जादा काम करण्याचा नियम केला आहे. साहजिकच, एरवीपेक्षा कर्मचाऱ्यांना सोमवार ते शुक्रवारदरम्यान रोज अर्धा तास लवकर कार्यालयात पोचून सायंकाळी कार्यालयातून उशिरा निघावे लागणार आहे. 

अडीचशे कर्मचाऱ्यांची गैरसोय 
मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, देवळाली कॅम्प-भगूर, इगतपुरी आणि कसारा या भागातील किमान 260 ते 270 कर्मचारी रोज पंचवटी एक्‍स्प्रेसने मुंबईला ये- जा करतात. त्यात, मंत्रालयासह इतरही अनेक कार्यालयांत काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा सगळ्या कर्मचाऱ्यांची नव्या वेळापत्रकानंतर गैरसोय होणार आहे. नाशिक-मुंबईप्रमाणे पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. मात्र, कधी काळी संबधित कर्मचाऱ्यांसाठी काही वेळ वाढवून दिली आहे. त्या बदल्यात इतर दिवस भरून देण्याची किंवा सुट्यात ते बदलून घेण्याची सुविधा आहे. त्या धर्तीवर पंचवटी एक्‍स्प्रेसने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी सुविधा मिळणार का? याकडे कर्मचारी डोळे लावून आहेत. 

Web Title Government Employees Are In Trouble For Five Days A Week Due To Timing Of Panchavati Express

संबंधित बातम्या

Saam TV Live