सरकारी दूध खरेदी सोमवारपासून बंद, अतिरिक्त दुधाचं करायचं काय?

साम टीव्ही
रविवार, 26 जुलै 2020
  • सरकारी दूध खरेदी सोमवारपासून बंद
  • योजना सुरू ठेवण्य़ाची उत्पादकांची मागणी
  • अतिरिक्त दुधाचं करायचं काय?उत्पादकांसमोर प्रश्न

दुधाला दर मिळत नसल्याने अगोदरच दूध उत्पादकांनी १ ऑगस्टपासून दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा दिलाय. त्यातच आता राज्य सरकारही दूध खरेदी बंद करणार आहे. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण होणारेय.

लॉकडाऊनदरम्यान दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली दूध खरेदी योजना येत्या सोमवारपासून बंद करण्यात येणारेय.त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेला दूध उत्पादक आणखी अडचणीत येणारेय.

लॉकडाऊनमुळे सण समारंभ, उत्सव आणि हॉटेलं तसंच मिठाईची दुकानं बंद असल्याने दुधाची मागणी घटली. त्यामुळे बहुतांश दूध संघांनी खरेदी बंद केली. परिणामी शिल्लक दुधाचं करायचं काय़, असा प्रश्न दूध उत्पादकांसमोर उभा राहिला. ही बाब लक्षात घेत दररोज दहा लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने एप्रिलमध्ये घेतला. 

राज्य सरकारद्वारे खरेदी केल्या जाणाऱ्या अतिरिक्त दुधापासून दूध भुकटी आणि बटर बनवलं जात होतं. मात्र आता दुधाची भुकटी आणि बटरचा अतिरिक्त साठा उत्पादकांकडे पडून आहे. त्यातच केंद्र सरकारने 10 हजार टन दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतलाय.

त्यामुळे आता भुकटी उत्पादकही अडचणीत आलेत. एकंदरच सद्यस्थिती पाहता अतिरिक्त दुधाचा प्रश्न भविष्यात आणखी जटील बनणार हे नक्की.


संबंधित बातम्या

Saam TV Live