पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणे जवळपास अशक्यच; उत्पादन शुल्कामध्ये सवलत द्यायला सरकारचा स्पष्ट नकार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका सलग सोळाव्या दिवशीही कायम आहे. आज पेट्रोलचे दर 23 पैसे तर डिझेलचे दर 23 पैशांनी पुन्हा वाढले. 

मुंबईत पेट्रोल 88 रुपये 12 पैसे, तर डिझेल 77 रुपये 32 पैशांवर पोहोचलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीतील चढ-उतारामुळे, भारतातील इंधनाचे दर वाढतायेत.

शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याने त्याचा थेट परिणामही पेट्रोल-डिझेलच्या दरावर होत असल्याचं पाहायला मिळतंय. एकिकडे इंधन दराची झेप घेणं सुरु असताना, पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये सवलत द्यायला सरकारनं स्पष्ट नकार दिलाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live