सावधान! तुमच्या पर्सनल डेटावर आता सरकारचीही नजर?

सावधान! तुमच्या पर्सनल डेटावर आता सरकारचीही नजर?

जर तुम्ही फोन, इंटरनेटसह कुठल्याही डिजिटल माध्यमाचा वापर करत असाल तर सावधान...

आजच्या फास्ट युगात कुठलीही माहिती गुप्त ठेवणे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे वैयक्तिक, खाजगी महत्त्वाची  माहिती गोपनीय ठेवणे अवघड झाले आहे. आता तर तुमच्या पर्सनल डेटावर सरकारचीही नजर राहण्याची शक्यता आहे.

कारण तुमच्या पर्सनल डेटावर सरकार नजर ठेवण्याची शक्यता आहे. यासंदर्भात महत्त्वपूर्ण पावलं सरकार उचलत आहे. पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2019 याच आठवड्यात लोकसभेत सादर केलं जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या विधेयकाच्या माध्यमातून देशातील नागरिकांच्या डिजिटल माहितीचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने कायदा करण्याच्या तयारीत आहे. या विधेयकाची पर्सनल, सेंसिटिव्ह पर्सनल, आणि क्रिटिकल पर्सनल अशा तीन मोठ्या भागात विभागणी करण्यात आलीय. विधेयकातील तरतूदीनुसार सरकार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एखाद्या व्यक्तीचा पर्सनल डेटा कुठल्याही तपास यंत्रणेला पुरवण्याचा आदेश देऊ शकते.

या विधेयकाची पर्सनल, सेंसिटिव्ह पर्सनल आणि क्रिटिकल पर्सनल अशा तीन मोठ्या भागात विभागणी करण्यात आलेली आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सरकार गरज पडल्यास नागरिकांच्या तिन्ही श्रेणीमधील पर्सनल डेटापर्यंत कुठल्याही अडथळ्याविना पोहोचण्याचा मार्ग मोकळा करत आहे. या विधेयकातील तरतुदीनुसार सरकार कुठल्याही इंटरनेट प्रोव्हायडरला आणि गुगल, ट्विटर, फेसबूकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एखाद्या व्यक्तीचा पर्सनल डेटा कुठल्याही तपास यंत्रणेला पुरवण्याचा आदेश देऊ शकते. मात्र कुठल्याही खाजगी व्यक्तीकडून त्याचा खासगी डेटा मागितला जाणार नाही.
त्यामुळे डिजिटल माध्यमातील चुकीचं वर्तन तुम्हाला अडचणीत आणू शकतं.

Web Title - Marathi News government will also can see your personal data?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com