दहीहंडी उत्सवाला गालबोट; थरावर थर लावताना मुंबईत फिट आल्यानं एका गोविंदाचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलंय. धारावीत थर रचताना एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय.

दहीहंडी फोडण्यासाठी थर रचत असताना चक्कर आल्यानं कुश खंदारेचा तोल जाऊन तो खाली पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलवण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सायन रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. धारावी येथील बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या दहीहंडीत दुपारी साडेतीनच्या सुमारास पहिल्या थरावर चढत असताना कुशला फिट आली.

त्यानंतर त्याला उपचारांसाठी सायन रुग्णालयात नेलं असताना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. याशिवाय, शहर-उपनगरातील उत्सवात ६० गोविंदा आतापर्यंत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live