चांगली बातमी | देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट

चांगली बातमी | देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट

देशव्यापी लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम आता दिसण्यास सुरुवात झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये हळूहळू घट होऊ लागली आहे. विशेष म्हणजे आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्याही वाढतेय.

आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. मागील 24 तासांत 941 नव्या रुग्णांची नोंद झाली असून त्यापूर्वीच्या 24 तासांत हा आकडा 1 हजार 76 वर होता. तर पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्याही अडीचशेच्या वर गेली आहे. 
मागली 14 दिवसांत देशातल्या एकूण 325 जिल्ह्यांत एकही रुग्ण आढळलेलना नाहीये. 13 ते १15 एप्रिलच्या तुलनेत रुग्णसंख्येत कमालीची घट पाहायला मिळतेय. 
दरम्यान, देशात आतापर्यंत 13387 जणांना कोरोनाची बाधा झालीय. यातले 1749 पूर्णपणे बरे झालेत तर 11 हजार 201 जणांवर उपचार सुरू आहेत. देशभरात आतापर्यंत 437 लोक दगावले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय. महाराष्ट्रात सर्वाधिक 3205 रुग्ण आढळले आहेत तर  मध्य प्रदेशात 1120 रुग्ण  आहेत. गुजरात आणि दिल्लीमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. 

देशातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता 13 हजार 387 वर पोहचलीय.. तर 437 जणांचे कोरोनानं बळी घेतलेत. मात्र असं असलं तरी दिलाशाची बाब म्हणजे 1 हजार 749 रुग्ण कोरोनावर मात करुन घरीही परतले आहेत. सध्या 11 हजार 201 जणांवर उपचार सुरु आहेत. आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिलीय. महाराष्ट्रात सर्वाधिक 3 हजार 205 रुग्ण आहेत. तर दिल्लीत 1 हजार 640 जणांना कोरोनाची लागण झालीय. इकडे मध्य प्रदेशात 1 हजार 120 रुग्ण आढळलेत. तर गुजरातमध्ये 871 रुग्णांची नोंद झालीय.

Web Title - marathi news A gradual decline in the number of Corona patients in the country

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com