VIDEO | 'या' नवरदेवानं वरातीत उडवले तब्बल 90 लाख रुपये !

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 4 डिसेंबर 2019

लग्न झालं, लग्नाची वरात निघाली...आणि अर्ध्या रस्त्यातच अचानक पैशांचा पाऊस पडू लागला...पाचशे, दोन हजाराच्या नोटा पडू लागल्या...पण, एवढे पैसे कोण उधळत होतं...? कुठे पडला पैशांचा पाऊस पाहुयात...

 

लग्न झालं, लग्नाची वरात निघाली...आणि अर्ध्या रस्त्यातच अचानक पैशांचा पाऊस पडू लागला...पाचशे, दोन हजाराच्या नोटा पडू लागल्या...पण, एवढे पैसे कोण उधळत होतं...? कुठे पडला पैशांचा पाऊस पाहुयात...

 

कुणी गाडीच्या टपावर चढून पैसे उडवतोय तर कुणी बसवर चढून पैसे फेकतोय. बघावं तिकडे पैसेच पैसे पाहायला मिळतायत. कुणाच्या हातात 2 हजारांच्या नोटा, तर कुणाच्या हातात पाचशे, दोनशेच्या नोटा दिसतायत. नुसती पैशांची उधळण सुरूय. लग्नाच्या वरातीमध्ये पैसे उडवले जातायत. वरातीमध्ये नवरदेवाच्या नातेवाईकांनी पैशांची तुफान उधळण केलीय. पैसे उधळत असताना, एक दोन लाख नव्हे तर तब्बल 90 लाख रुपये उडवलेत. लाखो रुपयांची उधळण करताना हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं या लग्नाची सगळीकडेच चर्चा होतेय.

गुजरातच्या जामनगरच्या चेला गावात हा सगळा प्रकार घडलाय. जडेजा कुटुंबातील ऋषिराज जडेजाचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवानं हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती. हेलिकॉप्टरमधून नवरीची पाठवणी करण्यात आली. त्यानंतर नवरदेवाच्या मोठ्या भावासह नातेवाईकांनी वरातीत पैशांची उधळण केली. लग्नाच्या वरातील बॅन्डबाजाच्या तालावर नाचता नाचता लाखो रुपये उडवले.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उडवलेले सगळे पैसे 5 गावांमधील गोशाळेला दान करणार असल्याचं सांगण्यात आलं. पण, लग्नाच्या वरातीत लाखो रुपयांच्या नोटा उधळल्यानं ह्या लग्नाची गुजरातमध्येच नव्हे तर देशभर तुफान चर्चा होतेय.

Web Title - Groom raises Rs 90 lakhs in his marriage.


संबंधित बातम्या

Saam TV Live