भारताच्या जीसॅट-30 उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी; इंटरनेटचा स्पीड वाढणार

भारताच्या जीसॅट-30 उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी; इंटरनेटचा स्पीड वाढणार

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आज (ता. 17) एक यशस्वी कामगिरी केली. GSAT-30 या कम्युनिकेशन सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण आज इस्रोने केले. दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून हे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात क्रांती होणार आहे. या उपग्रहामुळे इंटरनेटच्या गतीत प्रगती होईल.

India's communication satellite #GSAT30 was successfully launched into a Geosynchronous Transfer Orbit by #Ariane5 #VA251.

Thanks for your support !!!

For details please visit: https://t.co/FveT3dGuo6

Image Courtesy: Arianespace pic.twitter.com/67csn0zZq7

— ISRO (@isro) January 16, 2020

आज पहाटे 2 वाजून 35 मिनिटांनी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. GSAT-30 या उपग्रहाचे वजन 3,100 किलो आहे. प्रक्षेपणापासून पुढील 15 वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार असून या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित करण्यात आले आहे. दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असलेला हा उपग्रह इंटरनेटच्या गतीवर काम करेल. 2015 मध्ये लॉन्च केलेल्या INSAT-4च्या जागी आता GSAT-30 काम करेल. त्याची कार्यमर्यादा संपुष्टात आल्यामुळे व तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे GSAT-30चे प्रक्षेपण करण्यात आले आहे.

इंटरनेटची गती वाढणार - GSAT-30 मुळे इंटरनेट क्षेत्रात मोठी प्रगती होणार असून इंचरनेटची गती वाढण्यावर हा उपग्रह काम करेल. तसेच व्हिसॅट, टेलिकम्युनिकेशन, डिजी सॅटेलाईट, टेलिव्हीजन अपलिकींग, डिटीएच या सेवांसाठीही या उपग्रहाची मदत होणार आहे. हवामान आणि त्यात होणाऱ्या बदलाबाबत माहिती देण्यासाठी या उपग्रहाचा वापर करण्यात येईल.

Webtitle: GSAT 30 Satellite successfully launched; Internet Speed will increase

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com