जीएसटीचा फटका मुंबईतील घरविक्रीवर 

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुंबई व परिसरातील (एमएमआर प्रदेश) गृहनिर्माण क्षेत्राला अजूनही उभारी आल्याचे दिसत नसून, सन २०१९ या संपूर्ण वर्षात घरांची निर्मिती आणि विक्री यांच्यात तफावत कायम असल्याचे दिसून आले आहे. तुलनेत घरांचे दर काही प्रमाणात घसरलेले आहेत हीच काय ती दिलासा देणारी बाब असली तरीही एकूणच वाजवी दरातील घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत, हेही स्पष्ट झाले आहे. या उलट भाडेतत्त्वावरील कार्यालयीन जागेचे मार्केट मात्र तेजीत आहे.

दरम्यान, एमएमआर प्रदेशात सन २०१९च्या दुसऱ्या सहामाहीत ६१ टक्के नवीन प्रकल्पांची वीट रचली गेली. ही घरे वाजवी दरातील असल्याचा दावा केला जात असून, या घरांच्या किंमती ७५ लाख रुपयांच्या आसपास आहेत. भाडेतत्त्वावरील कार्यालयीन जागेची मागणी वाढती आहे. कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, पवई, भांडुप व चेंबूर आदी भागांमध्ये कार्यालयीन जागेचे व्यवहार वाढले आहेत.

सन २०१९मध्ये ७९ हजार ८१० घरे बांधली गेली. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीपेक्षा दुसऱ्या सहामाहीत हा वेग मंदावला. या सहामाहीत ३५ हजार ९८८ घरे बांधली गेली. विक्रीच्या बाबतीत बोलायचे तर सन २०१९मध्ये घरविक्री सहा टक्क्यांनी घटली. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ही घट १४ टक्के होती.दरम्यान, एमएमआर प्रदेशात सन २०१९च्या दुसऱ्या सहामाहीत ६१ टक्के नवीन प्रकल्पांची वीट रचली गेली. ही घरे वाजवी दरातील असल्याचा दावा केला जात असून, या घरांच्या किंमती ७५ लाख रुपयांच्या आसपास आहेत. भाडेतत्त्वावरील कार्यालयीन जागेची मागणी वाढती आहे. कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, पवई, भांडुप व चेंबूर आदी भागांमध्ये कार्यालयीन जागेचे व्यवहार वाढले आहेत.
 
मुंबई व परिसरातील (एमएमआर प्रदेश) गृहनिर्माण क्षेत्राला अजूनही उभारी आल्याचे दिसत नसून, सन २०१९ या संपूर्ण वर्षात घरांची निर्मिती आणि विक्री यांच्यात तफावत कायम असल्याचे दिसून आले आहे..

संबंधित बातम्या

Saam TV Live