'जीएसटी'ने मारले ; 'मुद्रांक'ने तारले

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 मार्च 2018

सोलापूर : "जीएसटी' अनुदान न मिळाल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या महापालिकांना मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे यापूर्वीचे अनुदान न मिळाल्याने "जीएसटी'ने मारले ; "मुद्रांक'ने तारले असे म्हणण्याची वेळ या महापालिकांवर आली आहे. 

सोलापूर : "जीएसटी' अनुदान न मिळाल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या महापालिकांना मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे यापूर्वीचे अनुदान न मिळाल्याने "जीएसटी'ने मारले ; "मुद्रांक'ने तारले असे म्हणण्याची वेळ या महापालिकांवर आली आहे. 

नगर विकास विभागाने पाच मार्च रोजी आदेश काढून 18 महापालिकांना जीएसटीपोटी अनुदान मंजूर केले होते. सोलापूर, पुणेसह तब्बल 9 महापालिकांना हे अनुदान मंजूर केले नाही. त्यामुळे या महापालिकांतील कर्मचाऱ्यांचा पगार लांबणीवर पडण्याची शक्‍यता होती. दरम्यान, मुद्रांक शुल्कापोटी द्यावयाच्या एक टक्का रकमेचे अनुदान शासनाने मंजूर केले असून, ते तब्बल 23 महापालिकांना मिळणार आहे. 

जीएसटीपोटी द्यावयाच्या अनुदानाचा आदेश दर महिनाखेरीस किंवा तीन तारखेच्या आत जारी होतो. त्यामध्ये सर्व 27 महापालिकांना द्यावयाच्या अनुदानाचा उल्लेख असतो. मात्र मार्च महिन्यासाठी शासनाने जारी केलेल्या जीएसटी अनुदानाच्या यादीत फक्त 18 महापालिकांचा समावेश होता. आता मुद्रांकाच्या अनुदानामध्ये 23 महापालिकांचा समावेश असल्याने या महापालिकांनाही दिलासा मिळणार आहे. 

महापालिका व मंजूर अनुदान कोटी रुपयांत 
(एकूण मंजूर रक्कम ः 514.94 कोटी) 

ठाणे (33.73), मीरा-भाईंदर (19.51), कल्याण-डोंबिवली (19.92), वसई-विरार (33.93), उल्हासनगर (3.98), पुणे (137.30), पिंपरी-चिंचवड (114.32), सांगली-मिरज-कुपवाड (3.58), कोल्हापूर (6.20), सोलापूर (18.60), नाशिक (53.66), मालेगाव (4.89), अहमदनगर (7.10), जळगाव (3.41), धुळे (2.24), औरंगाबाद (9.94), लातूर (1.91), नांदेड (2.67), परभणी (1.54), अकोला (2.94), नागपूर (27.81), चंद्रपूर (1.0). 


संबंधित बातम्या

Saam TV Live