सॅनिटरी नॅपकीन, टीव्ही, फ्रीज, वॉशिंगमशीन आजपासून होणार स्वस्त

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 जुलै 2018

जीएसटीतून करुमुक्त केल्यानं स्वस्त झालेल्या वस्तूंच्या नव्या कररचनेची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.

सॅनिटरी नॅपकीनसह अनेक वस्तू करमुक्त करण्यात आल्या असून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसह ५० हून अधिक वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी स्वस्त होणार आहेत.

जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार १००हून अधिक वस्तू स्वस्त होणार आहेत असे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलंय.

21 जुलै रोजी पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांवर आजपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे. 

WebTitle : marathi news GST TV Fridge sanitary napkin price drop  

संबंधित बातम्या

Saam TV Live