घरगुती गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना, वाचा काय असतील यंदाच्या गणेशोत्वाचे नियम

साम टीव्ही
शुक्रवार, 31 जुलै 2020
  • घरगुती गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना
  • घरगुती गणपती मूर्ती 2 फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी
  • आगमन, विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत
  • विसर्जनासाठी घरगुती गणेशमूर्ती बाहेर घेवून जाण्यास परवानगी नाही
  • गणेशमूर्तीचे विसर्जन बादलीमध्ये किंवा ड्रममध्ये करणे बंधनकारक
     

गणेशोत्वासंदर्भात दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या. पहिली बातमी आहे, गणपतीसाठी कोकणात गावी जाणाऱ्यांसाठी, तर दुसरी बातमी आहे, मुंबईत घरगुती गणपती बसवणाऱ्यांसाठी चाकरमान्यांनी गावी न येता मुंबईतूच दर्शन घ्यावं असं आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केलंय. कोकणात चाकरमान्यांना गावी घेऊन येण्याबाबत अजूनही सरकारचा निर्णय झाला नाही. अवघे 22 दिवस गणेशोत्सवाला शिल्लक राहिलेयत.

चाकरमानी दरवर्षी मोठ्या संख्येनं गणेशोत्सवाला येत असतात. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी कोरोनाची आकडेवारी वाढत चाललीय. त्यामुळे चाकरमान्यांनी येणं आवश्यक असेल त्यांनीच यावं. ज्यांना आवश्यकता नसेल त्यांनी तिथूनच दर्शन घ्यावं असं आवाहन खासदार विनायक राऊत यांनी चाकरमान्यांना केलंय. कोकणात ही स्थिती असताना इकडे मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं गणेशोत्सवासाठी कडक नियम केले आहेत. या नियमांचं पालन न केल्यास कारवाई करण्याचाही इशारा पालिकेकडून देण्यात आलाय. 

कोकणात ही स्थिती असताना इकडे मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं गणेशोत्सवासाठी कडक नियम केले आहेत. मुंबई महानगरपालिकेनं घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी काय मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. काय आहेत या सूचना. पाहा..


संबंधित बातम्या

Saam TV Live