आजीसारखं नाक असले म्हणून सत्ता मिळेल असे नाही : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 मार्च 2019

अहमदाबाद (गुजरात): आजीसारखं नाक असले म्हणून सत्ता मिळेल असे नाही, असे
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यावर टीका करताना म्हटले आहे.

विजय संकल्प रॅलीत बोलताना मनसुख मांडविया म्हणाले, 'प्रियंका गांधी यांची चेहरापट्टी इंदिरा गांधीसारखी असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. काँग्रेसमध्ये चर्चा आहे की, प्रियांका गांधीं यांचे नाक हे अगदी त्यांच्या आजी इंदिरा गांधीं यांच्यासारखे आहे. आजीसारखे जर नाक आहे म्हणून सत्ता मिळत असती, तर मग चीनमधील प्रत्येक घरात अध्यक्ष नसता का?'

भाजपच्या नेत्यांनी यापूर्वीही प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली आहे. गेल्या महिन्यात भाजप खासदार हरिश द्विवेदी यांनी प्रियंका गांधीवर टीका करताना दिल्लीत त्या जीन्स, टॉप घालतात आणि प्रचारादरम्यान साडी नेसून भांगेत कुंकू भरतात, असे म्हटले होते.

Web Title: Having nose like grandmother does not ensure power says Union minister Mansukh Mandaviya

संबंधित बातम्या

Saam TV Live